सुस्वागतम्...सुस्वागतम्...या आमच्या ब्लॉगला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत...

menu bar

सहशालेय उपक्रम सन 2020-2021

 

शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम संपन्न
शिरपूर प्रतिनिधी--- येथील जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीक माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण होते. यांचे शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस विनम्रपणे अभिवादन केले. याप्रसंगी काही विद्यार्थी उपस्थित होते कोविड 19 चार प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टंसिंगचा वापर करून बैठक व्यवस्था करण्यात आली होती. रोशनी कांडल पावरा या विद्यार्थीनीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती सांगितली. शिक्षकांच्या भाषणात जे.बी.पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक कार्य विविध उदाहरणांच्या माध्यमातून सांगितले. अध्यक्षीय भाषणात आय.पी.चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वांनी वाचावे व त्यांचे गुण अंगी बाणावेत असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.ए.पाटील यांनी केले तर आभार पी.ए.बडगुजर यांनी मानले.
 












 
 
आदि जनता विद्या प्रसारक संस्थेत प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण संपन्न
शिरपूर प्रतिनिधी-- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे सुपाबाई शिवराम अंतुर्लीकर प्राथमिक विद्यालय शिरपूर व शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय आदर्श नगर येथे संपन्न झाला. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एफ.ए. खाटीक यांचे हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीताचे सामूहिक गायन होऊन राष्ट्रीय सलामी देण्यात आली. याप्रसंगी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आर.पी.चव्हाण यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण ध्वजनेता कृष्णा विठ्ठल कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट गाईड प्रार्थना व झंडागीत यांचे गायन होऊन सलामी देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.पी.जाधव यांनी केले.
 













 
 
शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती कार्यक्रम संपन्न
शिरपूर प्रतिनिधी- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सुजित संजय ईशी व शिवानी संजय भोई या विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्याविषयीची थोडक्यात माहिती सांगितली शिक्षकांच्या भाषणात के.पी. बोरसे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान याविषयी सविस्तर अशी उदाहरणांसह माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.बी. पाटील यांनी केले. आभार एस.बी. बडगुजर यांनी मानले.









 
 
 

शिवराम भिमजी अंतुर्लीकर विद्यालयाचा दहावीचा निकाल 98% टक्के 

शिरपूर प्रतिनिधी : येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक 

विद्यालय शिरपूर या शाळेचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2020 दहावीचा निकाल 98 टक्के 

लागला. शाळेतून 50 विद्यार्थी प्रविष्ठ होते त्यापैकी 49 विद्यार्थी उत्तीर्ण झाले यात शाळेत

प्रथम क्रमांक - निशा भटू ठाकरे 85.80%

           द्वितीय क्रमांक - पुष्पराज ज्योतिराम महाजन 85.40%

तृतीय क्रमांक - सरस्वती तुकाराम पावरा 85.20%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन प्रा.पी एस अंतुर्लीकर यांसह शाळेचे मुख्याध्यापक 

आय.पी.चव्हाण व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन: पाठ्यपुस्तकांचे वितरण:

 शिरपूर प्रतिनिधी येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेची इमारत व परिसर सॅनेटाईझ फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आला. 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली तरीही कोरोना या व्हायरस मुळे शाळा नियमित सुरू झाल्या नाहीत.या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व सुरक्षिततेसाठी संस्थेचे चेअरमन प्रा. पी एस अंतुर्लीकर यांच्या मार्गदर्शनाने विद्यालयाची इमारत, कार्यालय, वर्गखोल्या व शालेय परिसर सॅनेटाईझ फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आला. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यां समवेत पालकांना शाळेत टप्प्याटप्प्याने बोलावून सोशल डिस्टन्सिंगचा पुरेपूर वापर करून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. पालकांना व विद्यार्थ्यांना कोविड 19 संदर्भात समुपदेशन करण्यात आले. तसेच, शाळा नियमित सुरू होईपर्यंत ऑनलाईन अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले.






शिवराम भिमजी अंतुर्लीकर विद्यालयात महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम संपन्न

शिरपूर प्रतिनिधी-- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय

 शिरपूर या शाळेत 6  डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी 

शाळेचे मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण हे होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन

 मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सुजित संजय ईशी या विद्यार्थ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 

जीवन कार्याबद्दलचीची माहिती सांगितली.श्री एस बी बडगुजर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक 

कार्य, शैक्षणिक कार्य, राजकीय कार्य याविषयी विविध उदाहरणांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

 यांच्या कार्याचा आलेख थोडक्यात सांगितला. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित विद्यार्थी यांनी

 बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

 






 

शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयाची इमारत व 

परिसर निर्जंतुकीकरण:

 शिरपूर प्रतिनिधी येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक

 विद्यालय शिरपूर या शाळेची इमारत व परिसर सॅनेटाईझ फवारणी करून निर्जंतुकीकरण

 करण्यात आला. 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली तरीही कोरोना या

 व्हायरस मुळे शाळा नियमित सुरू झाल्या नाहीत.या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व 

सुरक्षिततेसाठी संस्थेचे चेअरमन प्रा. पी एस अंतुर्लीकर यांच्या मार्गदर्शनाने विद्यालयाची इमारत,

 कार्यालय, वर्गखोल्या व शालेय परिसर सॅनेटाईझ फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आला.

 यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यां समवेत पालकांना शाळेत टप्प्याटप्प्याने बोलावून सोशल डिस्टन्सिंगचा पुरेपूर वापर 

करून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. पालकांना व विद्यार्थ्यांना कोविड 19

 संदर्भात समुपदेशन करण्यात आले. तसेच, शाळा नियमित सुरू होईपर्यंत ऑनलाईन 

अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

असे आवाहन करण्यात आले.

 











 अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयात म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती संपन्न

शिरपूर येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती कार्यक्रम संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टंसिंगचा वापर करत थोर पुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.



 

 शिवराम भिमजी अंतुर्लीकर अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयात बालिका दिनाचा 

कार्यक्रम संपन्न

शिरपूर प्रतिनिधी - येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक 

विद्यालय शिरपूर या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात 

आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 

यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन त्यांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती सुजित संजय ईशी, मयुर मोहन कोळी,

  कु. रोहिणी साहेबराव कोळी या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सांगितली. शिक्षकांच्या भाषणात

 जे. बी. पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक कार्याची 

माहिती विविध उदाहरणांसह सांगितली. सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रासह समाज प्रबोधनाचेही

 कार्य फार मोठ्या प्रमाणात केले होते. अध्यक्षीय भाषणात आय.पी. चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले यांचे

 चरित्र सर्वांनी वाचावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीपाटील यांनी केले तर आभार

 एस.बी. बडगुजर यांनी मानले.

 

शिवराम भिमजी अंतुर्लीकर विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रम संपन्न
शिरपूर प्रतिनिधी-- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद  यांच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.श्रीमती पी.ए.बडगुजर यांनी राजमाता जिजाऊ व के. बी. लोहार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती सांगितली.राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे चरित्र सर्वांनी अभ्यासावे असे शाळेचे मुख्याध्यापक यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी,ए. पाटील यांनी केले. आभार एस.बी.बडगुजर यांनी मानले.




 

 

 

No comments:

Post a Comment