सुस्वागतम्...सुस्वागतम्...या आमच्या ब्लॉगला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत...

menu bar

सहशालेय उपक्रम सन 2023-2024

                 

                         01 मे 2024 महाराष्ट्र दिन कार्यक्रम





















     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 
                                          14.04.24















     मतदान जनजागृती
         08.04.24









                        महात्मा ज्योतिबा फुले जयंती 











  मतदान जनजागृती रॅली 










                          मतदान जनजागृती प्रतिज्ञा 


















                                 मराठी राजभाषा दिन 















                                      शिवजयंती 


























































                                  पालक सभा 






  26जानेवारी 2024




































                                    बालिका दिन कार्यक्रम            















































                              व्यसनमुक्त अभियान कार्यक्रम













                                           रांगोळी स्पर्धा







                               भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
                                महापरिनिर्वाण दिन साजरा










                                भारतीय संविधान दिन 









       15 ऑक्टोबर 2023 डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम
                          यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस
शिरपूर प्रतिनिधी :- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयात भारतरत्न, मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आय. पी. चव्हाण होते. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. एस. बी. बडगुजर यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे अंतराळातील संशोधन व राष्ट्रपती म्हणून त्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. के. बी. लोहार यांनी वाचनाचे महत्त्व या विषयावर उदाहरणासहित मार्गदर्शन केले.
        जे. बी. पाटील यांनी 15 ऑक्टोबर हात धुवा दिनानिमित्त हात धुण्याचे महत्त्व सांगून हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. अध्यक्षीय भाषणात आय.पी. चव्हाण यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांनी अधिकाधिक वाचन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.ए. बडगुजर यांनी केले आभार एस.एम. दौंड यांनी मानले.






















                                 15ऑक्टोबर 2023 हात धुवा दिवस






















02 ऑक्टोबर 2023 
अंतुर्लीकर विद्यालयात म.गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्सव संपन्न
 शिरपूर प्रतिनिधी :- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयात म. गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.
        एक तारीख एक तास श्रमदानात विद्यालयातील शिक्षकांनी शालेय परिसराची व विद्यार्थ्यांनी शालेय इमारतीची स्वच्छता केली. दोन ऑक्टोबर रोजी आदर्श नगर, सुभाष कॉलनी, भोई गल्ली परिसरात प्रभात फेरी काढून स्वच्छतेबाबतच्या घोषणा देण्यात आल्या. रॅलीच्या समारोपप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली.
       विद्यालयाचे मुख्याध्यापक आय. पी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन होवून विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेअंतर्गत म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती सांगितली. यात जयवंती केल्ला पावरा, रूपाली रेसल्या पावरा यश शरद भोई यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. जे. बी. पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती सांगितली. एस. बी. बडगुजर यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती उदाहरणासह सांगितली. उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सर्वधर्म प्रार्थनाचे गायन करून कार्यक्रमाची सांगता केली. 
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. बी. लोहार यांनी केले. आभार एन.जे.गोस्वामी यांनी मानले.







































स्वच्छता ही सेवा २०२३ अंतर्गत 'एक तारीख - एक तास' महाश्रमदान









श्री गणेश चतुर्थी 2023 -2024





5 सप्टेंबर 2023 शिक्षक दिवस
शिरपूर प्रतिनिधी :- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
आजच्या दिवसाचे शाळेचे कामकाज विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका घेऊन चालविले.
शाळेचे मुख्याध्यापक आय. पी. चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व विद्यार्थी मुख्याध्यापक रूपाली रेसल्या पावरा हिच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनींचा गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांनी सत्कार केला. शिक्षकाची भूमिका घेतलेल्या विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती सांगितली. व स्वतःचे अनुभव कथन केले.
 के. बी. लोहार यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा थोडक्यात जीवनपट सांगून शिक्षक दिनाचे महत्त्व, शिक्षक- विद्यार्थी संबंध, शिक्षकाचे स्थान व कर्तव्य याबाबत उदाहरणांसह माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका मुरलीधर माळी हिने केले. तर आभार साने तन्मय योगेश याने मानले.






















चंद्रयान थ्री लँडिंग प्रक्षेपण




15 ऑगस्ट 2023



13 ऑगस्ट 2023





















09 ऑगस्ट 2023





















08 ऑगस्ट 2023







लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम





















जागतिक लोकसंख्या दिन



26 जून 2023
सामाजिक न्याय दिन











आंतरराष्ट्रीय योग दिवस








शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम























अंतुर्लीकर विद्यालयात गुणवंतांचा सन्मान परिश्रमाने उंच भरारी घ्या: प्रा.पी.एस.अंतुर्लीकर

विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी जिद्द, चिकाटी, परिश्रमाने उंच भरारी घ्या आणि आई-वडिलांसह शाळेचे नाव मोठे करा. आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रा. पी. एस. अंतुर्लीकर यांनी  दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना गौरव उद्गार काढले.

मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयातून कु. मानसी सुरेश भोई, जितन सतिष पावरा व  प्रथमेश जीवन बडगुजर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. त्यांच्यासह आई-वडिलांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष प्रा. अंतुर्लीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रा अंतुर्लीकर पुढे म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांपुढे मोठे आव्हान आहे. त्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणारे विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ यांचेही अभिनंदन केले.

याप्रसंगी मानसी सुरेश भाई हिने मनोगत व्यक्त करून विद्यालयातील प्रेरणादायी आठवणी व शिक्षकांप्रतीचा आदरभाव व्यक्त केला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आय पी चव्हाण वसतिगृहाचे व्यवस्थापक हिरालाल शिरसाठ, अशोक येवले, राजश्री कुलकर्णी यांसह शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.बी.लोहार यांनी केले. आभार पी. ए. बडगुजर यांनी मानले.

















 











 

No comments:

Post a Comment