महिला पालक मेळावा 2024.2025
9.2.2025
महिला पालक मेळावा 2023.2024
महिला पालक मेळावा 2022.2023
*शिवराम भिमजी अंतुर्लीकर विद्यालयात महिला पालक मेळावा व किशोरी मेळावा संपन्न*
शिरपूर प्रतिनिधी :- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत दि.21 रोजी शिक्षक महिला पालक मेळावा व सोबतच किशोरी मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या चिटणीस सौ. लीलाबाई अंतुर्लीकर या होत्या. सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन प्रास्ताविकात पी.ए. बडगुजर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शाळेतील विविध उपक्रम व शासनाच्या विविध योजना याविषयी माहिती सांगितली. उपस्थित पालक भगिनींनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी शंका विचारल्या त्यांचे निरसन शाळेचे मुख्याध्यापक आय. पी. चव्हाण यांनी केले.
या महिला पालक मेळाव्यासोबतच किशोरी मेळावा अंतर्गत चि. अनिरुद्ध खरे व कु. रिद्धी कोकीळ या मेडिकल कॉलेज बोराडी येथील विद्यार्थिनींनी किशोरवयीन मुलींनी व महिलांनी मासिक पाळी ककालावधत घ्यावयाची आरोग्य विषयक काळजी व आहार तसेच समज गैरसमज याविषयी माहिती सांगितली. उपस्थित सर्व महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. बी. पाटील यांनी केले. आभार एस.एम. दौड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
महिला पालक मेळावा 2019.2020
No comments:
Post a Comment