राजश्री छत्रपती शाहू महाराज समृद्धी शताब्दी वर्ष
1मे महाराष्ट्र दिन

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती
महात्मा ज्योतिबा फुले जयंती
शिवजयंती कार्यक्रम
कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम
राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद यांची जयंती
शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक आय. पी. चव्हाण हे अध्यक्षस्थानी होते. राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन वैभव संजय गोसावी,सपना अशोक कुंभार या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याबद्दलची माहिती सांगितली.
जे. बी. पाटील यांनी राजमाता जिजाऊ भोसले यांचा जीवनपट सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्यात त्यांची जी भूमिका होती ती उदाहरणासह सांगितली. के.बी. लोहार यांनी स्वामी विवेकानंद यांचे बालपण, त्यांची अभ्यास वृत्ती, भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य सांगून शिकागो येथील सर्वधर्म परिषदेचा वृत्तांत सांगितला. अध्यक्षीय भाषणात आय.पी. चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे चरित्र विद्यार्थ्यांनी वाचावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.ए.पाटील यांनी केले. आभार एन.जे. गोस्वामी यांनी मानले.
बालिका दिन
दि.24/12/2022 रोजी आदि जनता विद्या प्रसारक मंडळ संचलित शिवराम भीमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत पुज्य साने गुरुजी जयंती साने गुरुजींचा चित्रपट दाखवून साजरा करण्यात आली
गणित दिवस श्रीनिवास रामानुजन जन्म दिवस
चित्रकला स्पर्धा
रांगोळी स्पर्धा
महापरिनिर्वाण दिन
संविधान दिन
बाल दिन
शिक्षण दिन
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती
5सप्टेंबर 2022 शिक्षक दिवस
15 ऑगस्ट 2022
9 ऑगस्ट 2022 क्रांती दिवस
गणवेश वाटप कार्यक्रम

L
जागतिक लोकसंख्या दिन
वृक्षारोपण
किशोरवयीन मुलींसाठी व्याख्यान कार्यक्रम
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती साजरी
जागतिक योग दिनाचा कार्यक्रम संपन्न
आदि जनता विद्या प्रसारक संस्थेत जागतिक योग दिनाचा
कार्यक्रम संपन्न
शिरपूर प्रतिनिधी - येथील आदि जनता विद्या
प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर व सुपामाय
शिवराम अंतुर्लीकर प्राथमिक विद्या मंदिर शिरपूर यांचे संयुक्त विद्यमाने आदर्श
नगर येथील शालेय प्रांगणात जागतिक योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
आर. पी. जाधव यांनी जागतिक योगदिनाबाबतची
माहिती सांगून योगाचे महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून पटवून दिले. उपस्थित
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विविध योगासने केलीत.
यात पद्मासन, मयूरासन, त्रिकोणासन, हलासन, शवासन यांसह सूर्यनमस्कार
आदि आसनांचे प्रात्यक्षिक केले. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पी.पी. शिरसाठ व
माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आय. पी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग
दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम
आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर
माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत 15 जून रोजी शाळा
प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. 2022-23 या शैक्षणिक
वर्षासाठी पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे बँड पथकाच्या
साह्याने वाजत गाजत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या
स्वागतासाठी शालेय परिसर सुशोभित करण्यात आला होता. रांगोळ्या काढून पताके लावले
होते. त्यांना चॉकलेट देऊन वर्गात प्रवेशित करण्यात आले.
इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक
योजनेअंतर्गत पुस्तके वाटप करण्यात आली. उपस्थित विद्यार्थी व पालकांना
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत योग्य ती माहिती मुख्याध्यापक आय.पी.चव्हाण
यांनी दिली. कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन के.बी.लोहार यांनी केले.
प्रवेशोत्सव
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस.बी.बडगुजर, पी.ए.बडगुजर,जे.बी.पाटील,डी.ए.पाटील, एन.जे.गोसावी,
एस.एम.दौड यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment