विषय - ज्ञान, वाचन
आणि चिंतन
प्रा.
डॉ. लिलाधर शिवाजीराव पाटील
इंग्रजी
विभाग प्रमुख
धनदाई
कला व विज्ञान महाविद्यालय अमळनेर. जि. जळगाव
शिक्षण:
MA, NET, M.Phil. , Ph.D.
1. Ph.D.
Research title of the thesis:- "Construction of a Subaltern in the
Writings of Jotirao Phule and Tarabai Shinde"
2. सदस्य, इंग्रजी
अभ्यासक्रम मंडळ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
3. FY च्या
सर्व शाखांना असलेल्या AEC कोर्सच्या English for
All या पुस्तकाचे Cambridge
University Press ने प्रकाशन केलेले आहे.
4.
Traditions in Indian Literatures हे NEP अंतर्गत
भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित पुस्तक नुकतेच प्रकाशित
5. कवयित्री
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित कुलगुरू संशोधन प्रोत्साहन
योजनेअंतर्गत दोन मायनर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत.
6. विद्यार्थी
असतांना अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे.
त्याचप्रमाणे 2002 मध्ये बंगलोर तसेच 2003
साली नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय युथ फोरम मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
केलेले आहे.
7. छत्रपती
शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर विचारधारेशी संबंधित विविध चळवळीत सक्रिय कार्यरत
असून आजवर महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, केरळ, गोवा, उत्तर
प्रदेश, हरियाणा व उत्तराखंड आदी सहा
वेगवेगळ्या राज्यात प्रबोधनपर व्याख्याने दिलेली आहेत
8.
Discourse Analysis या संशोधन पत्रिकेच्या रेलेवन्स ऑफ
फुले-शाहू-आंबेडकर थॉट या विशेषांकाचे संपादन केले आहे
9. दोन
राज्यस्तरीय व दोन विद्यापीठस्तरीय सेमिनार/ वर्कशॉप चे आयोजन केलेले आहे
10. उत्तर
महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम यांच्या जीवनावर आधारित
"हमालपुरा ते कुलगुरू" या मिलिंद बागूल लिखित पुस्तकाचे इंग्रजी
ट्रान्सलेशन केले असून ते कर्नाटक विद्यापीठाच्या MA तौलनिक
भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट आहे
11. विविध
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकांमध्ये आजवर सोळा संशोधन पर लेख प्रसिद्ध
झालेले आहेत
12. डॉ.
पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेतर्फे दिला जाणारा "महात्मा फुले जीवन गौरव
पुरस्कार 2021" प्राप्त झालेला आहे.
13. अमळनेर येथे झालेल्या १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक म्हणून जबाबदारी
14. अमळनेर
येथे झालेल्या ५ व्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे
मुख्य संयोजक
आदि जनता विद्या प्रसारक संस्थेत मनोज गोविंदवार यांचे व्याख्यान
संपन्न
शिरपूर प्रतिनिधी:-
येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्था व प्रा. पी. एस. अंतुर्लीकर अण्णा
प्रतिष्ठान शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक
विद्यालयात जळगाव येथील वक्ते,
समुपदेशक, लेखक मनोज
गोविंदवार यांचे व्याख्यान दि.10
रोजी संपन्न झाले. अध्यक्षस्थानी आदि
जनता विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रा. पी. एस. अंतुर्लीकर हे होते.
व्याख्यान कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक व पालक सर्वश्री ज. ता. ईशी, सुभाष अहिरे, एम. के. भामरे, एम. सी. पाटील, प्रा. डॉ. फुला
बागुल, प्रा. डॉ. नागोजीराव डोंगरे, वाय.डी.बेडीस्कर, जगदीश कलाल, एन. एच. महाजन, आनंद देशमुख, राजेंद्र जाधव, सारिकाताई रंधे, शिल्पा जैन, पूनम पाटील आदी
उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
व्यक्तिमत्व विकास या विषयावरील व्याख्यानात मनोज गोविंदवार
म्हणाले की, विचार करता येणे,
प्रश्न सूचणे व स्वतःला भान येणे
म्हणजेच व्यक्तिमत्व विकास. पंच ज्ञानेंद्रियांचा योग्य वापर करणाऱ्यांचा कोणीही
पराभव करू शकत नाही. स्वप्न पाहायचे व ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची जोड
द्यायची. ए आयच्या दुनियेत माणूस हरवत चालला आहे. यासाठी स्वतःला ओळखायचे आहे.
स्वभाव, सवयी, मित्र व वाचन ही चतुसूत्री व्यक्तिमत्व घडवण्यात कामास येणार आहे.
हे पटवून देण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, कलेक्टर राजेंद्र
भारूड यांची उदाहरणे देऊन काही प्रसंग सांगितले. प्रत्येकाने स्वतःला ओळखायचे आहे
आणि कुठे थांबायचे हे ज्यांना कळते त्यांना पुढे जाता येते. आजच्या वर्तमान
स्थितीत आई-वडिलांचे मुलांशी नाते दुरावत चालले आहे. कुटुंबात संवाद कमी झाला आहे.
मोबाईलच्या चुकीच्या वापराने मुलांचे आयुष्य चुकीच्या दिशेने जात आहे. संस्थेचे
अध्यक्ष अंतुर्लीकर अण्णा वयाचे 81 व्या वर्षीही समाजोद्धाराचे काम करत आहेत. आदि जनता विद्या
प्रसारक संस्था व मा. प्रा. पी. एस. अंतुर्लीकरअण्णा प्रतिष्ठान यांनी चालविलेल्या
उपक्रमांबद्दल त्यांनी गौरव उद्गार काढले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. पी. एस. अंतुर्लीकर यांनी सांगितले की, मुलांच्या
भविष्याच्या दृष्टीने व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी व दिशा कळण्यासाठी आजचे
व्याख्यान म्हणजे एक वैचारिक मेजवानी होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत नवीन
व जीवनोपयोगी माहिती व्याख्यानातून मिळाली. यांसह त्यांनी खंत व्यक्त केली की, वाचन संस्कृती लोप
पावत चालली आहे. तरुणांनी, शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सारिका रंधे यांनी आपले
मनोगत व्यक्त केले. शिरपूर तालुका साहित्य संघाचे पदाधिकारी, साहित्यिक
बंधू-भगिनी, सुपामाय शिवराम अंतुर्लीकर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.
जी. देसाई, शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आय.
पी. चव्हाण, सुपाबाई शिवराम अंतुर्लीकर खाजगी आयटीआय कॉलेजचे प्राचार्य शेख
यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन जे. बी. पाटील यांनी केले. आभार आर.एस. नगराळे यांनी मानले.
































































No comments:
Post a Comment