आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे सुपामाय शिवराम अंतुर्लीकर प्राथमिक विद्या मंदिर शिरपूर या विद्यालयातील शिक्षक एफ.ए.खाटीक (माजी मुख्याध्यापक) आर. पी. जाधव (विषय शिक्षक) व्ही. व्ही. सोनवणे (उपशिक्षक) हे सेवानिवृत्त झालेत. त्यांचा सत्कार समारंभ 30 रोजी संस्थेचे चेअरमन प्रा. पी. एस. अंतुर्लीकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
याप्रसंगी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पी. पी. शिरसाठ, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आय. पी. चव्हाण, सुपाबाई शिवराम अंतुर्लीकर खाजगी आयटीआय कॉलेजचे प्राचार्य स्वप्निल बडगुजर यांसह प्राथमिक, माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन प्रा. पी. एस. अंतुर्लीकर यांचे शुभहस्ते सेवानिवृत्त शिक्षकांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, बुके व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पी.पी.शिरसाठ यांनी सेवानिवृत्त झालेले शिक्षक यांच्या सेवाकाळातील माहिती सांगितली. त्यांच्याअंगी असलेल्या विशेष गुणांचेही त्यांनी कौतुक केले. माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक के. बी.लोहार यांनी आपल्या मनोगतात संस्थेचे व संस्थाध्यक्षांचे शिक्षकांप्रती असलेले ॠण व्यक्त केले. सेवानिवृत्त शिक्षकांबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. डॉ. दिग्विजय जाधव या माजी विद्यार्थ्यांने आपल्या मनोगतात शाळेबद्दल, शाळेतील शिक्षकांबद्दल आणि वडील जाधव सर यांच्या बद्दल प्मारसंगासह माहिती सांगितली.
अध्यक्षीय भाषणात प्रा.पी.एस.अंतुर्लीकर यांनी सेवानिवृत्त झालेल्या तीनही शिक्षकांच्या प्रामाणिकपणाबद्दल व कामसूवृत्तीबद्दल कौतुक केले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी समाज शिक्षकाची भूमिका निभवावी असे आवाहनही केले. सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखाचे व निरामय आरोग्याचे जावो अशा सदिच्छा दिल्या.
सेवानिवृत्त शिक्षकांचा प्राथमिक, माध्यमिक व आटीआय कॉलेजातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच वसतिगृहाचे अधिक्षक यांनी शाल बुके व भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.एम.पाटोळे यांनी केले. तर आभार के.बी.पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment