सुस्वागतम्...सुस्वागतम्...या आमच्या ब्लॉगला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत...

menu bar

सहशालेय उपक्रम सन 2021-2022































































आदि जनता विद्या प्रसारक संस्थेत प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण संपन्न

















शिरपूर प्रतिनिधी :-- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर व सुपाबाई शिवराम अंतुर्लीकर प्राथमिक विद्यालय शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रजासत्ताक दिनाचे राष्ट्रीय ध्वजारोहण संस्थेच्या आदर्श नगर येथील शालेय प्रांगणात संपन्न झाले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एफ.ए. खाटीक यांचे  हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण यांसह संस्थेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करून सलामी देण्यात आली.भारत स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण ध्वजनेता गौरव संजय गोसावी याच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट गाईड प्रार्थना व  ध्वजगीत होऊन सलामी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.पी. जाधव व डी.ए.पाटील यांनी केले.


शिवराम भिमजी अंतुर्लीकर विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण होते. विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होतेयाप्रसंगी उपस्थित शिक्षकांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याबद्दल व त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबाबत चर्चा करण्यात आली.










राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद

 जयंतीचा कार्यक्रम संपन्न 

शिरपूर प्रतिनिधी:- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण होते. त्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जे. बी. पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती सांगितली. के. बी. लोहार यांनी स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र विविध उदाहरणांच्या माध्यमातून थोडक्यात विशद केले. विद्यार्थ्यांनी जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद यांचे चरित्र अभ्यासावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.बी. बडगुजर यांनी केले. आभार पी.ए. बडगुजर यांनी मानले.









शिवराम भिमजीअंतुर्लीकर विद्यालयात बालिका दिवस साजरा

शिरपूर प्रतिनिधी:- येथील आदि जनता विद्या प्रसारक मंडळाचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका पी.ए.बडगुजर हे होते. शाळेचे मुख्याध्यापक आय.पी.चव्हाण यांच्या शुभहस्ते . सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रोशनी कांडल पावरा, रोशनी नंदू भोई या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती सांगितली. एस.बी.बडगुजर एस.एम.दौड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य याविषयी विविध उदाहरणांसह माहिती सांगितली.या दिवसाचे औचित्य साधून शाळेत साडी डे साजरा करण्यात आला. तसेच “मी सावित्रीबाई फुले बोलतेय” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.बी.पाटील यांनी केले.आभार एन.जे.गोस्वामी यांनी मानले.












शिवराम भिमजी अंतुर्लीकर विद्यालयात

नववर्ष दिन साजरा














शिवराम भिमजी अंतुर्लीकर विद्यालयात महापरिनिर्वाण दिनाचा

 कार्यक्रम संपन्न

शिरपूर प्रतिनिधी-- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण हे होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी विशाल दिलीप पावरा या विद्यार्थ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती सांगितली.श्री एस बी बडगुजर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, राजकीय कार्य याविषयी विविध उदाहरणांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आलेख थोडक्यात सांगितला. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित विद्यार्थी यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन केले.














संविधान दिनाचा कार्यक्रम








शिरपूर येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयात संविधान

 दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आय. पी. चव्हाण होते

. एस.बी.बडगुजर यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगून संविधानाबाबतची विशेष माहिती सांगितली. जे. बी. पाटील

 यांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले. कार्यक्रमासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीचा कार्यक्रम







शिरपूर प्रतिनिधी:- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर

 माध्यमिक  विद्यालय शिरपूर या शाळेत महाकवी, रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या

जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण होते.

 प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर पंचायत समितीचे दीपक कोळी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते

 महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उमेश कोळी, रोशनी भोई यांनी

 वाल्मिक ऋषींबद्दलची माहिती सांगितली.‌ दीपक कोळी यांनी महर्षी वाल्मिक ऋषी यांचा जीवनपट

 थोडक्यात उदाहरणांसह सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.बी.लोहार यांनी केले. आभार जे.बी.पाटील

 यांनी मानले. 


*शिवराम भिमजी अंतुर्लीकर विद्यालयात इ.8 वी ते 10 वी चे वर्ग सुरू* 









शिरपूर प्रतिनिधी:- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयात

 आज 4 तारखेपासून शासनाच्या आदेशानुसार कोरोना महामारी संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून इयत्ता

 आठवी, नववी व दहावी चे वर्ग सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी ज्या पालकांनी संमती पत्रक भरून दिले

 आहे. असे सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन शाळेचे मुख्याध्यापक आय.पी.

 चव्हाण यांनी स्वागत केले.शाळेत आल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर प्रचंड हसू होते.

   शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाच्या नियमामांची  अंमलबजावणी झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी

 शिक्षण विस्तार अधिकारी जी.पी.कुमावत व पी.के.बागुल यांनी आज शाळेला भेट दिली. सर्व बाबींची पाहणी

 करून त्यांनी समाधान व्यक्त केले.


अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयात म.गांधी व लालबहादूर शास्त्री

 जयंती संपन्न







शिरपूर प्रतिनिधी:- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक

 विद्यालय शिरपूर या शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीचा कार्यक्रम

 उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण यांच्या हस्ते महात्मा गांधी व

 लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी

 उपस्थित होते. या दिवसाचे औचित्य साधून ऑनलाइन पद्धतीने रांगोळी, चित्रकला व निबंध स्पर्धांचे

 आयोजन करण्यात आले होते. यात रांगोळी स्पर्धेत रोशनी नंदू भोई. चित्रकला स्पर्धेत रूपाली अशोक

 रावताळे व निबंध स्पर्धेत मानसी सुरेश भोई यांनी प्रथम क्रमांक मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे

 व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आ


अंतुर्लीकर विद्यालयात साक्षरता दिनाचा कार्यक्रम संपन्न


शिरपूर प्रतिनिधी:-- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर

 माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्यात

 आला. या दिवसाचे औचित्य साधून ऑनलाइन पद्धतीने निबंध व शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन

 केले. निबंध स्पर्धेत रोशनी कांडल पावरा, निशा परशुराम पावरा, मानसी सुरेश भोई यांनी तर

 शुद्धलेखन स्पर्धेत रोशनी नंदू भोई, हरीष जीवन बडगुजर, रोहिणी साहेबराव कोळी यांनी

 अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे

 शाळेचे मुख्याध्यापक आय.पी.चव्हाण यांनी अभिनंदन केले. के.बी.लोहार व एस.बी.बडगुजर यांनी

 उपक्रम राबविले.





शिक्षक दिन

शिरपूर प्रतिनिधी येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत शिक्षक दिनानिमित्ताने शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्यात आला. 5 सप्टेंबर रोजी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आय.पी.चव्हाण, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षक गौरव सप्ताह अंतर्गत चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा चे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. यात रांगोळी स्पर्धेत मानसी सुरेश भोई, सपना अशोक कुंभार, संजना चंपालाल पावरा यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविले. चित्रकला स्पर्धेत अलिषा चव्हाण, अर्चना दिनेश पावरा, वैभव संजय गोसावी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविले. तर निबंध स्पर्धेत सोनाली रामसिंग गिरासे, रोशनी नंदू भोई, मानसी सुरेश भोई यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. पी.ए.बडगुजर, जे.बी.पाटील, एस.एम.दौड यांनी उपक्रम राबविले.











आदि जनता विद्या प्रसारक संस्थेत स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे सुपाबाई शिवराम अंतुर्लीकर प्राथमिक विद्यालय शिरपूर व शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर यांचे संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आदर्श नगर येथील शालेय प्रांगणात साजरा करण्यात आला. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आय.पी.चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारत स्काऊट गाईड या ध्वजाचे ध्वजारोहण ध्वजनेता वैभव संजय गोसावी याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एफ.ए. खाटीक यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व नियमांचे पालन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून प्राथमिक व माध्यमिक शाळेने ऑनलाइन पद्धतीने चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर पी जाधव व डी.ए.पाटील यांनी केले.

















अंतुर्लीकर विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

              शिरपूर प्रतिनिधी:- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेचा मार्च 2021 दहावीचा निकाल 100 टक्के लागला. शाळेतून 40 विद्यार्थी प्रविष्ट होते. शाळेत प्रथम क्रमांक विजय दिनेश पावरा 85:20 टक्के द्वितीय क्रमांक आशिष कमलाकर सोनार 83 टक्के  तृतीय क्रमांक सरस्वती पप्पू पावरा 82 टक्के. यांनी यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन प्रा. पी एस अंतुर्लीकर, शाळेचे मुख्याध्यापक आय.पी.चव्हाण व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

                                                प्रथम क्रमांक विजय दिनेश पावरा 85:20 टक्के

                                        
                             द्वितीय क्रमांक आशिष कमलाकर सोनार 83 टक्के


                                                    तृतीय क्रमांक सरस्वती पप्पू पावरा 82 टक्के.

 

अंतुर्लीकर विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन.

 शिरपूर प्रतिनिधी/ - येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मदिवसा निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. बहुजन समाजात शिक्षण प्रसारावर भर देणारे, अस्पृश्यता निवारण्यासाठी मोठे सामाजिक कार्य केलेले, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालविणारे राजे म्हणून राजर्षी शाहू महाराज यांची ओळख जनमानसात आहे. सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ असलेले राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो  विद्यालयात मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


अंतुर्लीकर विद्यालयात योग दिवस साजरा

शिरपूर/प्रतिनिधी :-येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. क्रीडाशिक्षक डी.ए.पाटील व श्रीमती जे.बी.पाटील यांनी योगासने व प्राणायाम यांचे महत्त्व सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने विविध योगासने व प्राणायाम करून घेतले. शाळेचे मुख्याध्यापक आय.पी.चव्हाण यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगासने, प्राणायाम व ध्यान साधना यांचे सादरीकरण केले.

 

No comments:

Post a Comment